बेळगाव : हिंडलगा–सुळगा येथील ७५ वर्षीय बाबुराव नाना पाटील हे १२ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी सुमारे १ वाजता गवत आणण्यासाठी घरातून शेताकडे गेले असून, त्यानंतर ते अद्याप घरी परतलेले नाहीत. कुटुंबीय, नातेवाईक आणि नागरिकांकडून विविध ठिकाणी शोध घेण्यात येत असला तरी त्यांचा अद्याप ठोस ठावठिकाणा लागलेला नाही.
बाबुराव पाटील हे घरातून जाताना सायकल, विळा आणि गवत आणण्याचे साहित्य घेऊन गेले होते. त्यांच्या सायकलवर गवताच्या चार पेंड्या होत्या. त्यांच्या अंगावर शेतातील कामाचे कपडे आणि हाफ पॅन्ट असल्याची माहिती देण्यात आली आहे.
कुटुंबीयांच्या माहितीनुसार, बाबुराव पाटील यांना कधी-कधी रस्ता चुकतो. अशावेळी आपण कुठे आहोत किंवा घर कोणत्या दिशेला आहे, हे त्यांना समजत नाही. त्यामुळे ते बेळगाव शहरातील किंवा आसपासच्या कोणत्याही भागात गेले असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
दरम्यान, काल सायंकाळी कॅम्प परिसरातील अंगडी कॉलेजजवळ तसेच महादेव मंदिर–काँग्रेस रोड परिसरात बाबुराव पाटील यांच्यासारखी व्यक्ती दिसल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे परिसरात शोध घेण्यात आला; मात्र त्यांचा अद्याप पत्ता लागलेला नाही.
त्यामुळे बेळगाव शहर व आसपासच्या परिसरातील नागरिकांना आपल्या परिसरात, रस्त्यावर, मंदिराजवळ, बसस्थानक परिसरात, शेतांमध्ये तसेच सार्वजनिक ठिकाणी लक्षपूर्वक पाहण्याचे आवाहन H.E.R.F Rescue Team कडून करण्यात आले आहे.
बाबुराव पाटील कुठेही आढळल्यास त्यांना एकटे सोडू नये आणि तातडीने H.E.R.F Rescue Team – 9922899500 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
एका वृद्ध व्यक्तीचा शोध घेण्यासाठी नागरिकांनी ही माहिती जास्तीत जास्त WhatsApp, Facebook, Instagram तसेच विविध ग्रुपमध्ये शेअर करून सहकार्य करावे, अशी विनंती करण्यात आली आहे. नागरिकांच्या एका फोनमुळे किंवा मिळालेल्या महत्त्वाच्या माहितीमुळे बाबुराव पाटील सुखरूपपणे आपल्या कुटुंबीयांपर्यंत पोहोचण्यास मदत होऊ शकते.
— H.E.R.F Rescue Team, Belagavi
