२२ वर्षांपासून मूलभूत नागरी सुविधांपासून वंचित; नागनाथ कॉलनीतील रहिवाशांचे आयुक्तांना निवेदन

२२ वर्षांपासून मूलभूत नागरी सुविधांपासून वंचित; नागनाथ कॉलनीतील रहिवाशांचे आयुक्तांना निवेदन

बेळगाव : महाद्वार रोड, क्रॉस क्रमांक ५, नागनाथ कॉलनी (सर्व्हे क्र. ३६६/१) येथील रहिवाशांनी गेल्या २२ वर्षांपासून मूलभूत नागरी सुविधांपासून वंचित असल्याची खंत व्यक्त करत बेळगाव महानगरपालिका आयुक्तांकडे निवेदन सादर केले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, नागनाथ कॉलनी ही एन.ए. लेआऊटमध्ये असून येथील रहिवासी नियमितपणे मालमत्ता कर, पाणीपट्टी तसेच इतर सर्व महानगरपालिका कर वेळेवर भरत आहेत. मात्र, इतक्या वर्षांनंतरही परिसरात पक्के रस्ते, गटारी, सांडपाणी निचरा व्यवस्था आणि इतर आवश्यक नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या नाहीत.

यामुळे परिसरातील नागरिकांना दैनंदिन जीवनात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून, पावसाळ्यात परिस्थिती अधिक गंभीर बनत असल्याचे रहिवाशांनी निवेदनात नमूद केले आहे.

महानगरपालिका प्रशासनाने या समस्येची तातडीने दखल घेऊन आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे.

या निवेदनाच्या प्रती आमदार अभय पाटील, बेळगाव महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त तसेच क्षेत्र अभियंता यांनाही देण्यात आल्या आहेत.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

six − one =

error: Content is protected !!