बेळगाव शहरात नंबर प्लेट नसलेल्या व दोषपूर्ण नंबर प्लेटच्या वाहनांवर पोलिसांचा विशेष धडक अभियान

बेळगाव शहरात नंबर प्लेट नसलेल्या व दोषपूर्ण नंबर प्लेटच्या वाहनांवर पोलिसांचा विशेष धडक अभियान

बेळगाव : शहरात नंबर प्लेट नसलेल्या तसेच दोषपूर्ण (Defective Number Plate) किंवा नियमबाह्य नंबर प्लेट असलेल्या दुचाकी वाहनांची संख्या वाढत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर बेळगाव शहर पोलिसांनी विशेष कारवाई मोहीम राबवली.

23 जुलै 2026 रोजी राबविण्यात आलेल्या या विशेष मोहिमेत 105 दुचाकी वाहने ताब्यात घेण्यात आली. या वाहनांच्या कागदपत्रांची तपासणी करून संबंधित वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. तसेच वाहतुकीच्या नियमांबाबत त्यांना समुपदेशन करण्यात आले. योग्य व नियमानुसार नंबर प्लेट बसवल्यानंतरच वाहने सोडण्यात आली.

पोलीस आयुक्तालयाने स्पष्ट केले आहे की, नंबर प्लेट नसलेली (Without Number Plate) किंवा दोषपूर्ण नंबर प्लेट (Defective Number Plate) असलेली वाहने शहरात चालविणाऱ्यांविरुद्ध यापुढेही अशीच विशेष मोहीम सुरू राहणार आहे. मोटार वाहन कायद्यानुसार अशा वाहनचालकांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.

वाहनधारकांनी वाहतूक नियमांचे पालन करून आपल्या वाहनावर नियमानुसार नंबर प्लेट बसवावी आणि कायद्याचे उल्लंघन टाळावे, असे आवाहन बेळगाव शहर पोलिसांनी केले आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

one × 1 =

error: Content is protected !!