मराठा लाइट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरमध्ये ७ ते ११ ऑगस्टदरम्यान अग्निवीर भरती मेळावा

मराठा लाइट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरमध्ये ७ ते ११ ऑगस्टदरम्यान अग्निवीर भरती मेळावा

UHQ कोट्याअंतर्गत जनरल ड्युटी, क्लर्क, ट्रेड्समन आणि म्युझिशियन पदांसाठी भरती:

बेळगाव : मराठा लाइट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर, बेळगाव येथे ७ ते ११ ऑगस्ट २०२६ या कालावधीत छत्रपती शिवाजी स्टेडियम येथे युनिट हेडक्वार्टर कोटा (UHQ) अंतर्गत अग्निवीर भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

या भरतीमध्ये अग्निवीर जनरल ड्युटी, अग्निवीर क्लर्क, अग्निवीर ट्रेड्समन तसेच म्युझिशियन ट्रेडसाठी पात्र उमेदवारांना संधी उपलब्ध होणार आहे.

ही भरती युद्धात शहीद झालेल्या जवानांच्या विधवा व पाल्यांसाठी, सेवेत असलेल्या व माजी सैनिकांच्या विधवा, पुत्र व बंधूंसाठी, उत्कृष्ट क्रीडापटूंसाठी आयोजित करण्यात आली असून म्युझिशियन ट्रेडसाठी सर्व पात्र उमेदवार अर्ज करू शकतात.

१ ऑक्टोबर २०२५ रोजी वय १७ वर्षे ६ महिने ते २२ वर्षे असलेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र असतील. शारीरिक चाचणी व वैद्यकीय तपासणीत पात्र ठरलेल्या उमेदवारांना ११ ऑक्टोबर २०२६ रोजी होणाऱ्या कॉमन एन्ट्रन्स एक्झाम (CEE) ला सामोरे जावे लागेल.

पात्रता, आवश्यक कागदपत्रे आणि इतर माहितीसाठी इच्छुक उमेदवारांनी मराठा लाइट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर, बेळगाव येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

four × four =

error: Content is protected !!