बेळगाव पोलिसांचा क्लब, बार व पब मालकांना इशारा; कार्ड गेम्सच्या नावाखाली बेकायदेशीर जुगार चालविल्यास कठोर कारवाई

बेळगाव पोलिसांचा क्लब, बार व पब मालकांना इशारा; कार्ड गेम्सच्या नावाखाली बेकायदेशीर जुगार चालविल्यास कठोर कारवाई

बेळगाव :
बेळगाव शहर पोलीस आयुक्तालयाने शहरातील सर्व क्लब, बार, पब आणि मनोरंजन केंद्रांच्या मालकांना कठोर सूचना जारी केल्या आहेत. काही ठिकाणी ‘कार्ड गेम्स’च्या नावाखाली बेकायदेशीर जुगार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर हा इशारा देण्यात आला आहे.

पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केले आहे की, अशा ठिकाणी बेकायदेशीर जुगार, सार्वजनिक शांततेला बाधा आणणारे प्रकार किंवा कायद्याचे उल्लंघन आढळल्यास संबंधित मालक व आयोजकांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

प्रेस नोटमध्ये क्लब, बार व पब चालकांना खालील बाबींचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत:

  • कार्ड गेम्सच्या नावाखाली कोणत्याही प्रकारचा जुगार चालवू नये.
  • बेकायदेशीर कृत्ये किंवा कायदा-सुव्यवस्थेला बाधा आणणाऱ्या व्यक्तींना प्रवेश देऊ नये.
  • सीसीटीव्ही व्यवस्था कार्यान्वित ठेवावी.
  • परवान्याच्या अटी व नियमांचे काटेकोर पालन करावे.
  • पोलिसांना तपासासाठी आवश्यक ती मदत करावी.
  • नियमांचे उल्लंघन झाल्यास संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करून परवाना रद्द करण्यासह कठोर कारवाई करण्यात येईल.

बेळगाव पोलिसांनी नागरिकांनाही अशा बेकायदेशीर प्रकारांची माहिती तात्काळ पोलिसांना देण्याचे आवाहन केले असून, शहरात कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

18 + 1 =

error: Content is protected !!