न्यायालयाच्या स्थगिती आदेशानंतरही महापालिकेची बुलडोझर कारवाई; आयुक्तांविरोधात अवमान याचिका दाखल

न्यायालयाच्या स्थगिती आदेशानंतरही महापालिकेची बुलडोझर कारवाई; आयुक्तांविरोधात अवमान याचिका दाखल

बेळगाव : शहरातील टिळकवाडी परिसरातील एका टपरीवर न्यायालयाने दिलेल्या अंतरिम संरक्षण आदेशानंतरही महापालिकेने बुलडोझर चालवत टपरी जमीनदोस्त केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी संबंधितांनी महापालिका आयुक्तांसह संबंधित अधिकाऱ्यांविरोधात न्यायालयात अवमान (Contempt of Court) याचिका दाखल केली असून, या घटनेमुळे शहरात मोठी चर्चा सुरू झाली आहे.

फिर्यादी गजानन भांडुरगे यांनी संबंधित जागेच्या ताब्याबाबत दिवाणी न्यायालयात दावा दाखल केला होता. या प्रकरणात न्यायालयाने दोन्ही पक्षांची बाजू ऐकून फिर्यादीच्या ताब्यात कोणताही हस्तक्षेप करू नये, तसेच कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत स्थिती कायम ठेवण्याचे अंतरिम आदेश दिले होते.

न्यायालयाचा आदेश अस्तित्वात असतानाही महापालिकेने संबंधित टपरीवर बुलडोझरची कारवाई केली. त्यामुळे न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन झाल्याचा आरोप करत फिर्यादीने न्यायालयाचा अवमान झाल्याची याचिका दाखल केली आहे.

यासंदर्भात टिळकवाडी पोलीस ठाण्यातही तक्रार दाखल करण्यात आली असून, न्यायालयाचा आदेश असूनही महापालिकेने कारवाई केल्याचे दस्तऐवज पोलिसांकडे सादर करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, महापालिकेच्या या कारवाईमुळे न्यायालयीन आदेशांचे पालन, नागरिकांच्या मालमत्तेचे संरक्षण आणि प्रशासनाच्या जबाबदारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. अवमान याचिकेवर न्यायालयात पुढील सुनावणी होणार असून, न्यायालय या प्रकरणात महापालिका प्रशासनाकडून खुलासा मागविण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

या प्रकरणात न्यायालयाचा निर्णय काय येतो, तसेच महापालिकेकडून कारवाईबाबत कोणते स्पष्टीकरण दिले जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

nine + 7 =

error: Content is protected !!