कंगराळ गल्लीत पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद; १०० टक्के लसीकरणाचा निर्धार

कंगराळ गल्लीत पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद; १०० टक्के लसीकरणाचा निर्धार

बेळगाव, दि. २८ : भारत सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या वतीने २८ ते ३० जून २०२६ या कालावधीत राबविण्यात येत असलेल्या राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेंतर्गत कंगराळ गल्ली येथील बूथ क्रमांक १९ वर सावित्री बिल्डिंग येथे लसीकरण मोहिमेची उत्साहात सुरुवात करण्यात आली.

मोहिमेच्या प्रारंभी उपस्थित असलेल्या पहिल्या पाच बालकांना गल्लीतील ज्येष्ठ नागरिक अनंतराव पाटील, माजी महापौर मालोजी अष्टेकर, गोपाळ निळकंठ, सौ. प्रीती सचिन पाटील आणि मालू निंगाप्पा बेळगावकर यांच्या हस्ते पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब देण्यात आले.

या मोहिमेपूर्वी केंद्रावर कार्यरत असलेल्या अंगणवाडी सेविका मालू निंगाप्पा बेळगावकर, रेणुका यल्लाप्पा करेगार, संगीता संजय पाटील आणि माधुरी यल्लेश सुळगेकर यांनी कंगराळ गल्ली परिसरात घरोघरी जाऊन जनजागृती केली. पालकांनी आपल्या पाच वर्षांखालील प्रत्येक बालकाला पोलिओचे थेंब पाजावेत, असे आवाहनही त्यांनी केले.

यावेळी एखादे-दुसरे आजारी बालक वगळता कंगराळ गल्ली परिसरात १०० टक्के लसीकरण पूर्ण करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. पोलिओमुक्त भारताच्या दिशेने हे अभियान यशस्वी करण्यासाठी नागरिकांनी आरोग्य विभागाला सहकार्य करावे, असे आवाहन आयोजकांनी केले.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

15 − 7 =

error: Content is protected !!