आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त वरिष्ठ नागरिकांसाठी योगाभ्यास शिबिर

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त वरिष्ठ नागरिकांसाठी योगाभ्यास शिबिर

बेळगाव : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त व्हॅक्सीन डेपो येथे आमदार श्री अभय पाटील यांच्या सिनीयर सिटीझन क्लबतर्फे योगाभ्यास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात सुमारे ६० ज्येष्ठ नागरिकांनी उत्साहाने सहभाग नोंदविला.

कार्यक्रमात वार्ड क्र. ४४ चे नगरसेवक श्री आनंदराव चव्हाण तसेच डॉ. अपर्णा कुलकर्णी आणि चैताली बोगार यांच्या मार्गदर्शनाखाली ज्येष्ठ नागरिकांना विविध योगासने, प्राणायाम आणि आरोग्यदायी योगाभ्यासाचे प्रकार शिकविण्यात आले. योगामुळे शारीरिक व मानसिक आरोग्य कसे सुधारते, तसेच वाढत्या वयात निरोगी जीवनशैली कशी राखता येते याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी नगरसेवक आनंदराव चव्हाण यांनी कार्यक्रमासाठी जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल आमदार अभय पाटील यांचे आभार मानले. त्यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असल्याचे सांगितले.

या कार्यक्रमास महिला ज्येष्ठ नागरिकांचीही लक्षणीय उपस्थिती होती. योगाभ्यास, संवाद आणि विविध उपक्रमांमुळे कार्यक्रम आनंददायी व खेळीमेळीच्या वातावरणात पार पडला.

ज्येष्ठ नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे कार्यक्रमाला विशेष यश लाभल्याची भावना आयोजकांनी व्यक्त केली.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

3 × one =

error: Content is protected !!