आर. पी. डी. पी. यू. महाविद्यालयात १२ वा आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

आर. पी. डी. पी. यू. महाविद्यालयात १२ वा आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

बेळगावी : आर. पी. डी. पी. यू. कला व वाणिज्य महाविद्यालय, बेळगावी येथे सोमवार, २२ जून २०२६ रोजी रानडे सेमिनार हॉलमध्ये १२ वा आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रा. मंजुनाथ दोड्डमनी यांनी प्रास्ताविक करून आंतरराष्ट्रीय योग दिनाचे महत्त्व तसेच योगाचा शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर होणारा सकारात्मक परिणाम याविषयी माहिती दिली.

यावेळी प्रमुख पाहुणे श्री. आनंद अरळीकट्टी आणि सौ. पुष्पा एम. यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत निरोगी जीवनशैलीसाठी योगाचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी विद्यार्थ्यांना दैनंदिन जीवनात योगाचा समावेश करण्याचे आवाहन केले.

योग प्रशिक्षकांनी विद्यार्थ्यांकडून विविध बैठी व उभी योगासने करून घेतली. प्रत्येक आसनाचे आरोग्यदायी फायदे, शरीराची लवचिकता वाढविणे, मानसिक शांतता प्राप्त करणे तसेच एकाग्रता वाढविण्यासाठी योगाचे योगदान याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली. नियमित योगाभ्यासामुळे निरोगी व संतुलित जीवन जगण्यास मदत होते, असेही यावेळी सांगण्यात आले.

कार्यक्रमास आर. पी. डी. पदवीपूर्व महाविद्यालयाच्या प्राचार्या तृप्ती शिंदे, क्रीडा शिक्षक प्रा. रामकृष्ण तसेच प्रा. प्रशांत मंकाळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे आभार प्रा. आनंद रत्नाप्पगोळ यांनी मानले.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

2 × 4 =

error: Content is protected !!