बेळगाव : शहर परिसरातील तसेच आसपासच्या नागरिकांना अत्याधुनिक, दर्जेदार व सर्वसमावेशक आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने डॉ. मनोज एस. पुजार (एम.डी. होमिओपॅथी) यांच्या ॲडव्हान्स्ड जर्मन होमिओपॅथी क्लिनिकच्या नव्या शाखेचा शुभारंभ रविवारी, दि. २१ जून २०२६ रोजी करण्यात आला. मंगळावरपासून हे क्लिनिक नागरिकांच्या सेवेत दाखल होणार आहे.
भारतामधील अग्रगण्य होमिओपॅथी क्लिनिक व हॉस्पिटलपैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या संस्थेने दीर्घकालीन न भरून येणाऱ्या जखमा तसेच जटिल आणि असाध्य आजारांच्या उपचार क्षेत्रात विशेष स्थान निर्माण केले आहे. अशा प्रकारच्या रुग्णांसाठी समर्पित सेवा देणारे हे देशातील अग्रगण्य होमिओपॅथी केंद्र मानले जाते.
रुग्णांच्या सोयीसाठी नव्या शाखेत अत्याधुनिक आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. गंभीर रुग्णांच्या सातत्यपूर्ण निरीक्षण व व्यवस्थापनासाठी स्वतंत्र डे-केअर युनिट, प्रगत उपचार बेड्स आणि आधुनिक वैद्यकीय सुविधांनी सुसज्ज स्वतंत्र ड्रेसिंग रूम, तसेच रुग्णांना आवश्यक औषधे सहज उपलब्ध व्हावीत यासाठी फार्मसीची व्यवस्था करण्यात आली आहे.
क्लिनिकमध्ये प्रगत होमिओपॅथिक उपचारपद्धती, वैयक्तिक आरोग्यसेवा, नैसर्गिक उपचार, दीर्घकालीन आरोग्य सुधारणा आणि रुग्णकेंद्रित सेवा यावर विशेष भर देण्यात येणार आहे. रुग्णांच्या शारीरिक, मानसिक आणि भावनिक आरोग्याचा सर्वांगीण विचार करून उपचार करणे ही या क्लिनिकची वैशिष्ट्यपूर्ण कार्यपद्धती आहे.
याबाबत बोलताना व्यवस्थापनाने सांगितले की, “आरोग्य सेवा सर्वांसाठी” या ध्येयाने प्रेरित होऊन हे केंद्र कार्यरत राहणार असून प्रत्येक नागरिकाला दर्जेदार, सुरक्षित आणि परिणामकारक आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
अनगोळ येथील मालिनी प्लाझाच्या मागे, नंदना आर्केड, पहिला मजला, कार्यालय क्र. १०८ येथे सुरू झालेल्या या नव्या शाखेमुळे परिसरातील नागरिकांना अत्याधुनिक होमिओपॅथी उपचार आणि आरोग्यसेवा स्थानिक पातळीवर उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
