कर्नाटक सरकारकडून वाहतूक दंडावर 50% सवलत; 21 जून ते 10 जुलैपर्यंत विशेष मोहीम

कर्नाटक सरकारकडून वाहतूक दंडावर 50% सवलत; 21 जून ते 10 जुलैपर्यंत विशेष मोहीम

बेळगाव : वाहनधारकांसाठी दिलासादायक निर्णय घेत कर्नाटक सरकारने प्रलंबित वाहतूक दंड (ट्रॅफिक फाइन) भरणाऱ्यांना 50 टक्के सवलत जाहीर केली आहे. राज्य सरकारच्या आदेशानुसार मे 2026 पूर्वी वाहतूक पोलिसांच्या ई-चलन प्रणालीमध्ये नोंद झालेल्या प्रकरणांवरील दंडाच्या रकमेत ही सवलत लागू करण्यात आली आहे.

सरकारच्या आदेशानुसार ही विशेष सवलत 21 जून 2026 ते 10 जुलै 2026 या कालावधीत (20 दिवस) लागू राहणार आहे. या कालावधीत वाहनधारकांनी प्रलंबित दंडाची रक्कम भरल्यास त्यांना केवळ 50 टक्के दंड भरावा लागणार असून उर्वरित रक्कम माफ करण्यात येणार आहे.

दंड कुठे भरता येणार?

वाहनधारकांना खालील ठिकाणी दंड भरता येणार आहे :

  • जवळच्या वाहतूक पोलीस ठाण्यात
  • पोलीस आयुक्त कार्यालयातील संबंधित कक्षात
  • कर्नाटक वन / बेळगाव वन सेवा केंद्रांमध्ये
  • ई-चलन मशीन असलेल्या वाहतूक पोलीस अधिकाऱ्यांकडे

बेळगावमधील सेवा केंद्रे

दंड भरण्यासाठी खालील केंद्रांवर सुविधा उपलब्ध आहे :

  • अशोक नगर
  • दूरदर्शन नगर (टीव्ही सेंटर परिसर)
  • रिसालदार गल्ली (जुनी कॉर्पोरेशन इमारत)
  • गोवावेस

वाहतूक नियमभंगामुळे प्रलंबित असलेले दंड कमी रकमेत भरून प्रकरणे निकाली काढण्याची ही संधी वाहनधारकांनी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

2 × 4 =

error: Content is protected !!