कन्नडसक्ती विरोधी मोर्चासाठी जांबोटी भागात जनजागृती; खानापूर समितीकडून पत्रकांचे वाटप

कन्नडसक्ती विरोधी मोर्चासाठी जांबोटी भागात जनजागृती; खानापूर समितीकडून पत्रकांचे वाटप

खानापूर : मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने २२ जून रोजी बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर आयोजित करण्यात आलेल्या कन्नडसक्ती विरोधी मोर्चाच्या पार्श्वभूमीवर खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीने जांबोटी परिसरात जनजागृती मोहीम राबविली.

मंगळवार, १६ जून रोजी जांबोटी बाजारपेठेत मोर्चाच्या जनजागृतीसाठी पत्रकांचे वाटप करण्यात आले. यावेळी नागरिकांना मोठ्या संख्येने २२ जून रोजी होणाऱ्या कन्नडसक्ती विरोधी आंदोलनात सहभागी होऊन मोर्चा यशस्वी करण्याचे आवाहन करण्यात आले.

जनजागृती फेरीत या भागातील माजी जिल्हा पंचायत सदस्य विलासराव बेळगावकर, जयराम देसाई, माजी सभापती मारुती परमेकर, खानापूर तालुका समितीचे अध्यक्ष गोपाळराव देसाई, सरचिटणीस आबासाहेब दळवी, युवा समितीचे अध्यक्ष धनंजय पाटील, राजाराम देसाई, डी. एम. भोसले गुरुजी, विठ्ठलराव देसाई, रवींद्र शिंदे, विठ्ठल गुरव, नाईक, राजू चिखलकर, शंकर सडेकर, प्रभाकर बिरजे, सुधीर पाटील, वसंत नावलकर, कृष्णा गावडे, हणमंत जगताप आदी कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला.

यावेळी उपस्थितांनी बाजारपेठ परिसरात फिरून पत्रकांचे वितरण केले तसेच मराठी भाषिक नागरिकांना मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

five × 5 =

error: Content is protected !!