बेळगाव, प्रतिनिधी : भारत विकास परिषदेच्या बेळगाव शाखेच्या अध्यक्षपदी विनायक मोरे यांची सर्वानुमते सलग तिसऱ्यांदा फेरनिवड करण्यात आली. गेल्या दोन वर्षांतील त्यांच्या उत्कृष्ट सेवाकार्याची दखल घेत सदस्यांनी त्यांच्यावर पुन्हा अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली.
नवीन कार्यकारिणीत के. वासुदेव प्रभू यांची सचिवपदी तर डी. वाय. पाटील यांची खजिनदारपदी निवड करण्यात आली. तसेच बेळगाव शाखेचे विनायक घोडेकर यांची कर्नाटक उत्तर प्रांत संगठन सचिव म्हणून निवड करण्यात आली आहे.
कार्यकारिणी सल्लागार मंडळात प्राचार्य व्ही. एन. जोशी, डॉ. व्ही. बी. यलबुर्गी, पांडुरंग नायक, डॉ. जे. जी. नाईक, नामजी देशपांडे, सुहास गुर्जर, सुभाष मिराशी, सुहास सांगलीकर, व्ही. आर. गुडी, सीए श्रीनिवास शिवणगी, जयंत जोशी, कुमार पाटील आणि स्वाती घोडेकर यांचा समावेश आहे.
कार्यकारी संघात विनायक घोडेकर, ॲड. सचिन जवळी, गणपती भुजगुरव, पी. एम. पाटील, अमर देसाई, रामचंद्र तिगडी, चंद्रशेखर इटी, मालतेश पाटील, कुबेर गणेशवाडी, नामदेव कोलेकर आणि पी. जे. घाडी यांचा समावेश आहे. महिला प्रमुख म्हणून सुखदा देशपांडे यांची निवड करण्यात आली असून प्रा. अरुणा नाईक, जया नायक, शुभांगी मिराशी, रजनी गुर्जर, विद्या इटी, लक्ष्मी तिगडी, प्रिया पाटील, स्मिता भुजगुरव, उषा देशपांडे, उमा यलबुर्गी, रोहिणी पाटील, स्नेहा सांगलीकर, तृप्ती देसाई, ॲड. बना कौजलगी, अक्षता मोरे, ज्योती प्रभू, नंदिनी पाटील, ज्योत्स्ना गिलबिले आणि मंगला कुलकर्णी या कार्यकारिणी सदस्या म्हणून कार्यरत राहणार आहेत.
भारत विकास परिषदेतर्फे दरवर्षी विविध सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक उपक्रम राबविले जातात. विकलांग सहाय्यता, मोफत आरोग्य तपासणी, ग्रामविकास, राष्ट्रीय समूहगायन स्पर्धा, ‘भारत को जानो’ प्रश्नमंजुषा, गुरु वंदना-छात्र अभिनंदन, ‘झाडे लावा-झाडे जगवा’ अभियान, स्वच्छता मोहीम, दहावी-बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती तसेच सेवा व संस्कार शिबिरांचे आयोजन ही परिषदेची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत.
