मंत्री लक्ष्मीताई हेब्बाळकर यांच्या निधीतून 150 मीटर रस्ता मंजूर
बेळगाव : बेळगाव ग्रामीण मतदारसंघाच्या आमदार तथा महिला व बाल विकास, अपंग आणि ज्येष्ठ नागरिक सक्षमीकरण मंत्री लक्ष्मीताई हेब्बाळकर यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेल्या कुद्रेमनी गावातील नाईकवाडी ते बेळगाव-वेंगुर्ला रस्त्याला जोडणाऱ्या मुख्य मार्गावरील 150 मीटर लांबीच्या सी.सी. रस्त्याच्या कामाचा शुभारंभ उत्साहात पार पडला.
या रस्त्याच्या बांधकामासाठी मंत्री लक्ष्मीताई हेब्बाळकर यांनी 20 लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. ग्राम पंचायत अध्यक्ष विनायक पाटील आणि शंकर पाटील यांच्या हस्ते रस्त्याच्या कामाचे पूजन करण्यात आले. यावेळी दीपक पाटील यांनी श्रीफळ वाढवून भूमिपूजन केले.
नाईकवाडी परिसरातील हा प्रमुख संपर्क रस्ता असून, अनेक वर्षांपासून ग्रामस्थांची या रस्त्याबाबत मागणी होती. लक्ष्मीताई हेब्बाळकर यांच्या पुढाकारामुळे ही मागणी पूर्ण होत असल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. या कामाचे ठेकेदार बाळकृष्ण पाटील आहेत.
कार्यक्रमाला रवी पाटील, अरुण देवण, धोडिंबा पाटील, बाळू कदम, शिवाजी गुरव, जोतिबा बडसकर, भरमाणा लोहार, केदारी गोवेकर, लक्ष्मण धामणेकर, लक्ष्मण कागणकर, रोहन पाटील, परशू नाईक, यल्लाप्पा नाईक यांच्यासह नाईकवाडी व कुद्रेमनी परिसरातील ग्रामस्थ आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी ग्रामस्थांनी सांगितले की, ग्रामीण भागाच्या विकासासाठी मंत्री लक्ष्मीताई हेब्बाळकर सातत्याने निधी उपलब्ध करून देत आहेत. नाईकवाडीतील हा महत्त्वाचा रस्ता पूर्ण झाल्यानंतर शाळकरी विद्यार्थी, शेतकरी आणि ज्येष्ठ नागरिकांची मोठी सोय होणार असून परिसरातील दळणवळण व्यवस्था अधिक सक्षम होईल.
रस्त्याच्या कामास सुरुवात झाल्याने ग्रामस्थांनी मंत्री लक्ष्मीताई हेब्बाळकर यांचे आभार व्यक्त केले.
