आरपीडी पदवी पूर्व महाविद्यालयात वृक्षारोपण मोहीम उत्साहात

आरपीडी पदवी पूर्व महाविद्यालयात वृक्षारोपण मोहीम उत्साहात

बेळगाव, दि. ९ जून : राणी पार्वतीदेवी पी.यू. कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या शारीरिक शिक्षण व क्रीडा विभागाच्या वतीने वृक्षारोपण मोहीम उत्साहात राबविण्यात आली. महाविद्यालय परिसरालगत असलेल्या लोकमान्य मुलांच्या वसतिगृहासमोर आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात विद्यार्थी व शिक्षकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

या कार्यक्रमास आरपीडी पदवी पूर्व महाविद्यालयाच्या कार्यकारी अध्यक्षा धनश्री अजगावंकर आणि उपाध्यक्षा श्रीमती लता कित्तूर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या रोपांचे वृक्षारोपण केले आणि पर्यावरण संरक्षणाची जबाबदारी स्वीकारण्याचा संकल्प केला.

उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना वृक्षांचे पर्यावरणातील महत्त्व पटवून देत लावलेल्या रोपांचे नियमित संगोपन व संवर्धन करण्याचे आवाहन केले.

यावेळी प्राचार्या तृप्ती शिंदे, प्रा. आनंद रत्नपागोळ, प्रा. महादेव खोत तसेच महाविद्यालयातील इतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

one × three =

error: Content is protected !!