बेळगावच्या रोटेरियनची आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरवशाली निवड

बेळगावच्या रोटेरियनची आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरवशाली निवड

बेळगाव : रोटरी ई-क्लब ऑफ बेळगावचे ज्येष्ठ सदस्य व समाजसेवक रोटेरियन नरसिंह जोशी यांची रोटरी इंटरनॅशनल कन्व्हेन्शन 2026 साठी विशेष निवड झाली असून त्यांना तैपेई, तैवान येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय अधिवेशनासाठी निमंत्रित करण्यात आले आहे. त्यांच्या या निवडीमुळे रोटरी डिस्ट्रिक्ट 3170 तसेच बेळगाव जिल्ह्याचा गौरव वाढला आहे.

रोटरी इंटरनॅशनलचे हे जागतिक अधिवेशन 13 ते 17 जून 2026 या कालावधीत तैपेई, तैवान येथे आयोजित करण्यात आले आहे. जगभरातील हजारो रोटेरियन या प्रतिष्ठित अधिवेशनात सहभागी होणार असून सेवा प्रकल्प, नेतृत्व विकास, जागतिक आरोग्य उपक्रम तसेच आंतरराष्ट्रीय सहकार्य यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होणार आहे.

रोटेरियन नरसिंह जोशी यांना विशेषतः “Polio Breakout Session” मध्ये सहभागी होण्यासाठी निमंत्रित करण्यात आले आहे. पोलिओ निर्मूलनासाठी रोटरी इंटरनॅशनलने जगभरात राबविलेल्या अभियानाच्या पार्श्वभूमीवर या सत्राला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. डिस्ट्रिक्ट 3170 चे प्रतिनिधित्व करताना श्री. जोशी हे बेळगावचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवणार आहेत.

रोटरी ई-क्लब ऑफ बेळगाव तसेच डिस्ट्रिक्ट 3170 मधील सदस्यांनी श्री. नरसिंह जोशी यांचे अभिनंदन करत त्यांच्या या यशाबद्दल अभिमान व्यक्त केला आहे. “सेवेचा दीप आंतरराष्ट्रीय स्तरावर नेणाऱ्या रोटेरियन नरसिंह जोशी यांना हार्दिक शुभेच्छा,” अशा शब्दांत सदस्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

समाजसेवा, मानवता आणि जागतिक आरोग्य क्षेत्रात रोटरीच्या माध्यमातून सातत्याने कार्य करणाऱ्या नरसिंह जोशी यांच्या या निवडीमुळे बेळगावच्या रोटरी चळवळीला नवी ओळख मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

19 − eight =

error: Content is protected !!