व्हॅक्सिन डेपो येथे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात

व्हॅक्सिन डेपो येथे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात

बेळगाव, दि. ६ जून : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त व्हॅक्सिन डेपो येथील सिनीयर सिटीझन क्लब परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणाऱ्या या उपक्रमात लोकप्रतिनिधी, महानगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

कार्यक्रमाला नगरसेवक आनंद चव्हाण आणि वॉर्ड क्रमांक २३ चे नगरसेवक जयंत जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी महानगरपालिकेचे पर्यावरण अभियंता प्रवीण कुमार, सॅनिटरी इन्स्पेक्टर लक्ष्मण मोहिते, सुरेश भट, डॉ. अपर्णा कुलकर्णी, अनिल चौगुले, गुरू भंडारी, सुधीर देशपांडे, वसंत हेबाळकर, सुरेश सुळेभावी, यशवंत परदेशी, किशोर कालकुंद्री, विष्णू पाटील, आर. आर. पाटील तसेच महानगरपालिकेचे अनेक कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी पर्यावरण संरक्षणासाठी वृक्षारोपणाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी प्रत्येक नागरिकाने झाडे लावण्याबरोबरच त्यांचे संगोपन करण्याची जबाबदारी स्वीकारण्याचे आवाहन केले. वृक्षसंवर्धनाच्या माध्यमातून हरित आणि स्वच्छ शहर उभारण्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांचे आभार मानून वृक्षसंवर्धनाचा संकल्प करण्यात आला.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

five − 4 =

error: Content is protected !!