आरपीडी पदवी पूर्व महाविद्यालयात जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा

आरपीडी पदवी पूर्व महाविद्यालयात जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा

बेळगाव, दि. ५ जून : आरपीडी पदवी पूर्व महाविद्यालयात जागतिक पर्यावरण दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्या सौ. तृप्ती शिंदे या होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. संतोष जयगौडर उपस्थित होते. आपल्या मार्गदर्शनपर भाषणात त्यांनी पर्यावरण संरक्षण ही काळाची गरज असल्याचे सांगत प्रत्येकाने वृक्षारोपणाबरोबरच वृक्षसंवर्धनाची जबाबदारी स्वीकारली पाहिजे, असे प्रतिपादन केले. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी विद्यार्थ्यांनी दैनंदिन जीवनात पर्यावरणपूरक सवयी अंगीकाराव्यात, असे आवाहनही त्यांनी केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. मंजुनाथ दोड्डमनी यांनी केले. जागतिक पर्यावरण दिनाचे महत्त्व विशद करताना पर्यावरण संवर्धनासाठी सामूहिक प्रयत्नांची आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थिनी पूर्वा पाटील हिने केले, तर नरहरी चव्हाण यांनी उपस्थितांचे आभार मानले.

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संरक्षणाविषयी जागरूकता निर्माण झाली असून पर्यावरण संवर्धनाचा संदेश प्रभावीपणे पोहोचल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

2 × two =

error: Content is protected !!