अल्पवयीन नवतेजचा विश्वविक्रम

अल्पवयीन नवतेजचा विश्वविक्रम

बेळगाव : सावगाव रोड, बेळगाव येथील कुमार नवतेज भूषण पालकर (वय ३) याने अवघ्या तीन वर्षांच्या वयात जागतिक विक्रमाची नोंद करत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. “चित्रांशिवाय टेक्स्टमधून १५ फळे व प्राण्यांची नावे सर्वात जलद वाचणे” या प्रकारात त्याने केवळ ३० सेकंदांत हे आव्हान पूर्ण करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

२७ मार्च २०२६ रोजी पार पडलेल्या या विक्रमामुळे नवतेजचे नाव प्रतिष्ठित Worldwide Book of Records मध्ये नोंदविण्यात आले आहे. विशेष म्हणजे, वयाच्या केवळ ३ वर्षे २५ दिवसांत त्याने ही कामगिरी साध्य केली असून इतक्या कमी वयात जागतिक विक्रम करणाऱ्या मुलांमध्ये त्याची गणना होत आहे.

नवतेजच्या या यशामागे वडील भूषण पालकर आणि आई प्रज्ञा पालकर यांचे मार्गदर्शन, प्रेमळ संगोपन आणि सातत्यपूर्ण परिश्रम यांचा मोठा वाटा असल्याचे सांगितले जात आहे. त्याच्या या यशाबद्दल विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत असून भविष्यातही नवतेज आणखी मोठी कामगिरी करेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

twelve + eight =

error: Content is protected !!