बेळगावात पोलिसांची धडक कारवाई; जुगार, मटका व अमली पदार्थ प्रकरणांत गुन्हे दाखल, अनेक आरोपी ताब्यात

बेळगावात पोलिसांची धडक कारवाई; जुगार, मटका व अमली पदार्थ प्रकरणांत गुन्हे दाखल, अनेक आरोपी ताब्यात

बेळगाव : शहरात विविध पोलीस ठाण्यांकडून गुन्हेगारीविरोधात धडक कारवाया करण्यात आल्या असून जुगार, मटका व अमली पदार्थ प्रकरणांत आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

खडेबाजार पोलीस ठाण्याची कारवाई:
२ मे २०२६ रोजी शिवाजी रोड परिसरात मटका जुगार सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी छापा टाकला. यावेळी परशुराम विनायक मोरे (वय २१, रा. कामत गल्ली, बेळगाव) याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून रोख रक्कम व जुगार साहित्य जप्त करण्यात आले. या प्रकरणी गुन्हा क्रमांक ४०/२०२६ अन्वये कलम ७८(iii) के.पी. अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मार्केट पोलीस ठाण्याची कारवाई:
वीरभद्रनगर परिसरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकून सहा जणांना ताब्यात घेण्यात आले. आरोपींमध्ये मोहसिनखान मुनिरखान पठाण (३६), शोएब मन्सूर मकानदार (३४), हरूनरशीद राजेसाब तिगडी (४६), जाफरसादिक इम्तियाज शेख (३१), मोहम्मदरशीद महमदसलीम बेपारी आणि जाफर मीरासाब सनदी (४३) यांचा समावेश आहे. पोलिसांनी रोख रक्कम व जुगार साहित्य जप्त केले असून गुन्हा क्रमांक ९२/२०२६ अंतर्गत कारवाई सुरू आहे.

माळमारुती पोलीस ठाण्याची कारवाई:
महांतेश नगर परिसरात अमली पदार्थ सेवन केल्याच्या संशयावरून श्रीकांत मुरगप्पा यक्कुंडी (वय २५) याच्यावर कारवाई करण्यात आली. वैद्यकीय तपासणीत त्याने गांजा सेवन केल्याचे निष्पन्न झाले असून त्याच्याविरुद्ध गुन्हा क्रमांक ८६/२०२६ अंतर्गत एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या सर्व कारवायांबद्दल संबंधित पोलीस अधिकाऱ्यांचे वरिष्ठांकडून कौतुक करण्यात आले आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

2 × four =

error: Content is protected !!