बेळगाव : पाणी संवर्धनाचा संदेश देण्यासाठी बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशन, जायंटस ग्रुप ऑफ परिवार बेलगाम आणि साई स्पोर्ट्स अकॅडमी बेलगाम यांच्या संयुक्त विद्यमाने “पाणी वाचवा जीवन वाचवा स्केटिंग रॅली”चे आयोजन करण्यात आले.
या रॅलीत ३ ते २५ वयोगटातील सुमारे ३५० स्केटिंगपटूंनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. रॅलीची सुरुवात गोवावेस स्विमिंग पूल येथून बेळगावच्या महापौर प्रिती विनायक कामकर यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी प्यास फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. माधव प्रभू यांनी उपस्थित स्केटर्सना पाणी बचतीचे महत्त्व पटवून दिले.
कार्यक्रमाला नगरसेवक नितीन जाधव, न्यायाधीश कमलकिशोर जोशी, प्रवीण त्रिवेदी, गंगाधर एम. तानाजी शिंदे, महेश आंबरोळे, राजशेखर रामदुर्ग, प्रशांत सनदि, सुहास निंबाळकर, विनायक अर्कसाली, महादेव केसरकर, महादेव बडबंजी, विवेक मिसाळ, गजानन शिंदे, प्रदीप पाटणकर, प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
या रॅलीमध्ये सौरभ साळोखे, आर्य कदम, दुर्वा पाटील, अमिषा वेर्णेकर, रश्मीता अंबिगा, मनन अंबिगा, हिरेन राज, कुलदीप बिर्जे, प्रीतम बागेवाडी, शल्य तरळेकर, आशिष अंगडीकर, सिद्धार्थ पाटील, धृती वेसने, श्रेयस बजंत्री आदी स्केटर्सनी सहभाग घेतला.
“पाणी वाचवा, जीवन वाचवा”, “पाणी अडवा, पाणी जिरवा, झाडे लावा, झाडे जगवा” अशा घोषणांनी वातावरण दणाणून गेले. सुमारे दोन किलोमीटरची ही रॅली यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आली.
रॅलीनंतर सहभागी सर्व स्केटर्सना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी योगेश कुलकर्णी, ऋषिकेश पसारे, सोहम हिंडलगेकर, विठ्ठल गंगणे आणि सागर चौगुले यांनी विशेष परिश्रम घेतले.
