बेळगावात सीसीबीची कारवाई; हेरॉईनसह दोघांना अटक

बेळगावात सीसीबीची कारवाई; हेरॉईनसह दोघांना अटक

बेळगाव : शहरातील गुन्हे शाखा (CCB) पोलिसांनी मोठी कारवाई करत हेरॉईन विक्री करणाऱ्या जाळ्याचा पर्दाफाश केला असून दोन आरोपींना अटक केली आहे. ही कारवाई १८ एप्रिल २०२६ रोजी सुळगा येथील देशपांडे गल्ली परिसरात करण्यात आली.

पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार आरोपी त्यांच्या घरातून मादक पदार्थांची विक्री करत असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार सीसीबीचे पोलिस निरीक्षक श्री. मंजुनाथ नायक यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने छापा टाकून आरोपींना ताब्यात घेतले.

अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे नागेश मधुकर भगत (वय ३५, रा. सुळगा) आणि राहुल ज्योतिबा जाधव (वय ३३, रा. कंग्राळ, के.एच.) अशी आहेत.

झडतीदरम्यान आरोपींकडून सुमारे २ लाख ६० हजार रुपयांच्या किमतीचे १२.९२ ग्रॅम हेरॉईन (एकूण ११९ पुड्या) तसेच दोन मोबाईल फोन जप्त करण्यात आले. तपासादरम्यान हे मादक पदार्थ तिसऱ्या आरोपी संतोष (रा. कोळवाड, मुंबई) याच्याकडून आणल्याचे उघड झाले आहे.

या प्रकरणी काकती पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक ९५/२०२६ अंतर्गत एनडीपीएस कायद्याच्या कलम २१(ब) आणि ८(क) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

ही यशस्वी कारवाई केल्याबद्दल पोलिस आयुक्तांनी सीसीबी पथकाचे कौतुक केले आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

seven − five =

error: Content is protected !!