महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागतर्फे पारंपारिक शिवजयंती उत्साहात साजरी; बेळगावात शिवभक्तीचा जल्लोष

महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागतर्फे पारंपारिक शिवजयंती उत्साहात साजरी; बेळगावात शिवभक्तीचा जल्लोष

बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागच्या वतीने शिवजयंती उत्सव पारंपारिक पद्धतीने आणि मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. छत्रपती संभाजी महाराज चौक येथे विविध गड-किल्ल्यांवरून आणलेल्या शिवज्योतींचे स्वागत करण्यात आले.

यावेळी नरगुंदकर भावे चौक, छत्रपती शिवाजी महाराज उद्यान (शहापूर), शिवसेना रिक्षा स्थानक (एस.पी.एम. रोड), कोरे गल्ली (शहापूर) आदी विविध ठिकाणी जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यात आले. शिवभक्तांनी जयघोष करत परिसर शिवमय केला.

शतकाहून अधिक वर्षांची वैभवशाली परंपरा असलेली बेळगावची शिवजयंती अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर साजरी केली जाते. या दिवशी संपूर्ण शहरातील गल्लीबोळ, चौक-चौक शिवभक्तीने भारून जातात. शिवरायांचा इतिहास घराघरात पोहोचवणे आणि सीमाभागातील जनतेच्या मनातील छत्रपतींप्रती असलेली आस्था व आदर व्यक्त करण्याचे हे महत्त्वाचे माध्यम असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.

शिवरायांच्या शौर्य, त्याग आणि स्वाभिमानाचे प्रतीक म्हणून हा उत्सव साजरा केला जात असून, यावर्षीची शिवजयंती व चित्ररथ मिरवणूक शांततेत आणि कोणताही अनुचित प्रकार न घडता पार पडावी, असे आवाहन युवा समिती सीमाभागचे अध्यक्ष शुभम शेळके यांनी केले.

या प्रसंगी कार्याध्यक्ष धनंजय पाटील, खजिनदार शिवाजी मंडोळकर, अशोक घगवे, सुरज जाधव, रमेश माळवी, मोतेश बारदेसकर यांच्यासह मोठ्या संख्येने शिवभक्त उपस्थित होते.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

8 + seven =

error: Content is protected !!