बेळगाव ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई; सोन्याच्या दुकानातील चोरी उघड – आरोपी अटकेत, 21.57 लाखांचा मुद्देमाल जप्त

बेळगाव ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई; सोन्याच्या दुकानातील चोरी उघड – आरोपी अटकेत, 21.57 लाखांचा मुद्देमाल जप्त

बेळगाव : बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या सोन्याच्या दुकानातील चोरीच्या प्रकरणाचा यशस्वी उलगडा करण्यात आला असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. या कारवाईत पोलिसांनी सुमारे 21,57,250 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

दिनांक 18 जानेवारी 2026 रोजी महेश गोकुळ काकतिकर, रा. शहापूर, बेळगाव यांनी त्यांच्या वाघवडे क्रॉसजवळील सोन्याच्या दुकानातून दागिन्यांची चोरी झाल्याची तक्रार बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली होती. या प्रकरणी गुन्हा क्रमांक 16/2026 अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलमांखाली गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आला.

पोलीस निरीक्षक नागणगौडा कट्टीमनी यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाची स्थापना करण्यात आली होती. या पथकाने तांत्रिक व गुप्त माहितीच्या आधारे दिनांक 7 एप्रिल 2026 रोजी आरोपी श्रीनिवास एन. उर्फ शीना, वय 37, रा. कालीदास बडवणे, कोरटगेरे, जि. तुमकूर (सध्या लक्केरे मार्केटजवळ, बेंगळुरू) याला अटक केली.

चौकशीत आरोपीने आपल्या साथीदारांसह चोरी केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून सुमारे 20,07,250 रुपये किंमतीचे 8 किलो 29 ग्रॅम चांदीचे दागिने तसेच 1,50,000 रुपये किंमतीची टाटा इंडिका कार (क्रमांक KA-03 AC-8668) जप्त करण्यात आली आहे.

या प्रकरणात एकूण 21,57,250 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.

या उल्लेखनीय कामगिरीसाठी पोलीस निरीक्षक नागणगौडा कट्टीमनी, पीएसआय संतोष दलवाई, पीएसआय लक्कप्पा जोडट्टी तसेच इतर कर्मचारी आणि तांत्रिक विभागातील अधिकाऱ्यांचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी कौतुक केले आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

2 × 5 =

error: Content is protected !!