बेळगाव : बेळगाव जिल्हा ज्येष्ठ नागरिक सोसायटीच्या संध्या किरण सेवा केंद्रामार्फत आयोजित ज्ञान व मनोरंजनाचा कार्यक्रम सोमवारपेठ, टिळकवाडी येथील डॉ. निता देशपांडे डायबेटिस सेंटरमध्ये उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विश्वास धुराजी होते. यावेळी व्यासपीठावर कार्यवाह सुरेंद्र देसाई व सहकार्यवाह शिवराज पाटील उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात विश्वास धुराजी व बाळकृष्ण बिर्जे यांच्या प्रार्थनेने झाली. यानंतर रविंद्रनाथ जुवळी, अश्विनी पाटील, नारायण कोरडे, डॉ. श्रेयास चौगुले, जगमोहन अगरवाल, भारती गावडे, सुरेंद्र व योगिनी देसाई, सुरेश खानोलकर, अशोक लोकूर, अशोक कदम, विजय वाईगडे व अरविंद मुतगेकर यांनी मराठी, हिंदी व कन्नड गीते सादर करून उपस्थितांची मने जिंकली. तसेच भरत गावडे व चंद्रशेखर गायकवाड यांनी काव्यवाचन सादर केले.
यावेळी सतीश देशपांडे, अनंत सावंत, ब्रम्हानंद तोरालकर, वसंत सावंत, भरत व भारती गावडे, अशोक काडापूर, शिवकुमार हुबरवाडी व गोपाळ देशपांडे या नव्या सभासदांचे स्वागत करण्यात आले.
कार्यक्रमादरम्यान ज्येष्ठ सदस्य अनंतराव हलगेकर यांनी संस्थेस वीस हजार रुपयांची देणगी जाहीर केली.
सुरेंद्र देसाई यांनी स्वागत केले तर आभार विनिता बाडगी यांनी मानले.
