बुलक कार्यक्रमात बदल; ४ एप्रिलला विशेष नाट्य सादरीकरण

बुलक कार्यक्रमात बदल; ४ एप्रिलला विशेष नाट्य सादरीकरण

बेळगाव : या आठवड्यातील बुलक कार्यक्रमाच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला असून, नियोजित शुक्रवारऐवजी आता हा कार्यक्रम शनिवार, ४ एप्रिल रोजी आयोजित करण्यात येणार आहे.

या विशेष कार्यक्रमात वरेरकर नाट्य संघाचा सहभाग असणार आहे. जागतिक रंगभूमी दिनानिमित्त २७ मार्चपासून सुरू झालेल्या मुलांच्या ८ दिवसांच्या नाट्य प्रशिक्षण शिबिराची सांगता यावेळी होणार आहे. प्रसिद्ध नाट्यकर्मी नीता कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेतलेल्या बालगोपाळांकडून त्यांनी शिकलेल्या कला-सादरीकरणाचे प्रदर्शन केले जाणार आहे.

त्यानंतर आसावरी भोकरे “नाटकाची कुळकथा” या विषयावर मार्गदर्शन करतील. तसेच प्रिया काळे, चिन्मय शेंडे, श्रेया सव्वाशेरी, जगदीश कुंटे आणि आसावरी भोकरे हे कलाकार विविध नाट्याविष्कार सादर करणार आहेत.

हा कार्यक्रम सायंकाळी ६.०० ते ७.३० या वेळेत पार पडणार असून सर्वांसाठी खुला आहे. आयोजकांनी नागरिकांनी मित्र-मैत्रिणींना सोबत घेऊन मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

3 − 1 =

error: Content is protected !!