कंग्राळ गल्लीतील श्री शिवाजी व्यायाम शाळेत हनुमान जयंती उत्साहात साजरी

कंग्राळ गल्लीतील श्री शिवाजी व्यायाम शाळेत हनुमान जयंती उत्साहात साजरी

बेळगाव : कंग्राळ गल्ली येथील श्री शिवाजी व्यायाम शाळेत हनुमान जयंती मोठ्या उत्साहात आणि भक्तीभावात साजरी करण्यात आली. यावेळी गल्लीतील पंचमंडळ व व्यायाम शाळेच्या व्यवस्थापकीय मंडळाच्या वतीने हनुमानाच्या प्रतिमेची सुरुवातीस विधिवत पूजा करण्यात आली.

पूजनानंतर पाळणा सोहळा आणि आरती पार पडली. त्यानंतर उपस्थितांना श्रीफळ वाटप करण्यात आले. संपूर्ण परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.

या कार्यक्रमाला माजी महापौर श्री. मालोजी अष्टेकर, अनंतराव पाटील, बाबुराव कुटरे, पप्पू उर्फ अनिल जाधव, महादेव बडवाणाचे, सुरेश धामणेकर, मोहन बडवाणाचे, सचिन का मुले, सदानंद बडवाणाचे, किरण सांबरेकर, जगन्नाथ कंग्राळकर, उदय कलघटगी, सुजय शंभूचे तसेच व्यायामपटू व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी आयोजकांनी विशेष परिश्रम घेतले.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

five + 10 =

error: Content is protected !!