टिळकवाडीतील सिद्धिविनायक देवस्थानात वर्धापनदिनानिमित्त दोन दिवसीय धार्मिक कार्यक्रम

टिळकवाडीतील सिद्धिविनायक देवस्थानात वर्धापनदिनानिमित्त दोन दिवसीय धार्मिक कार्यक्रम

बेळगावातील टिळकवाडी येथील सिद्धिविनायक देवस्थान सेवा समितीच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही वर्धापनदिनानिमित्त दोन दिवसीय धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम सिद्धिविनायक देवस्थान, महर्षी-महात्मा गांधी रोड, टिळकवाडी येथे पार पडणार असून विविध धार्मिक व आध्यात्मिक उपक्रमांचा समावेश आहे.

दि. ४ एप्रिल रोजी गणहोम, अभिषेक पूजा तसेच इतर धार्मिक विधींचे आयोजन करण्यात आले आहे. भाविक मोठ्या संख्येने सहभागी होऊन श्रींचे दर्शन व पूजेत सहभागी होणार आहेत.

दि. ५ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता जीवन विद्या मिशन, बेळगाव शाखेतर्फे हरिपाठ व भजन सादर करण्यात येणार आहे. यावेळी जीवन विद्या मिशनचे सदगुरु श्री वामनराव पै यांचे सतशिष्य श्री शंकरराव बांदकर यांचे कीर्तन होणार आहे.

कार्यक्रमाचा समारोप मंत्रपुष्प, प्रार्थना तसेच संकष्टी चतुर्थी निमित्त चंद्र पूजनाने होणार आहे. या धार्मिक सोहळ्याचा लाभ घेण्यासाठी सर्व भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

three × four =

error: Content is protected !!