बेळगाव: हिंदवाडी येथील घुमटमाळ मारुती मंदिरात हनुमान जयंतीनिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
बुधवार, दि. 1 एप्रिल रोजी सायंकाळी वारकरी संप्रदाय मंडळ, अनगोळ यांच्यावतीने भजनाचा कार्यक्रम होणार आहे. तर गुरुवार, दि. 2 एप्रिल रोजी पहाटे 4.00 वाजता हनुमान मूर्तीला अभिषेक करण्यात येणार असून त्यानंतर कृष्णमूर्ती बोंगाळे यांचे कीर्तन होईल. सकाळी 6.00 वाजता जन्मकाळ व तीर्थप्रसादाचे वितरण करण्यात येणार आहे.
याच दिवशी दुपारी 12.00 ते 3.00 या वेळेत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या सर्व कार्यक्रमांना भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मंदिर ट्रस्ट कमिटीचे अध्यक्ष चंद्रकांत बांडगी, सचिव प्रकाश माहेश्वरी व ट्रस्टींनी केले आहे.
