चैत्र यात्रेनिमित्त शिवबसव नगर येथील श्री जोतिबा मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन; 1 एप्रिलला अभिषेक-आरती, 6 एप्रिलला सासन काठी आगमन व महाप्रसाद

चैत्र यात्रेनिमित्त शिवबसव नगर येथील श्री जोतिबा मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन; 1 एप्रिलला अभिषेक-आरती, 6 एप्रिलला सासन काठी आगमन व महाप्रसाद

बेळगाव: शिवबसव नगर येथील श्री जोतिबा मंदिरात चैत्र यात्रेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. चैत्र पौर्णिमेनिमित्त बुधवार दिनांक 01 एप्रिल 2026 रोजी सकाळी 6.00 वाजता श्री जोतिबा देवाला अभिषेक, पादपूजा, अलंकार पूजा व आरती होणार असून सायंकाळी 8.00 वाजता महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे.

यावेळी सर्व भाविकांनी अभिषेक व आरतीस उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंदिराच्या वतीने करण्यात आले आहे.

तसेच देवदादा सासन काठीचे कोल्हापूरहून सोमवार दिनांक 06 एप्रिल 2026 रोजी श्री जोतिबा मंदिर, शिवबसव नगर, बेळगाव येथे आगमन होणार असून त्यानिमित्त दुपारी 12.00 ते 4.00 या वेळेत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्व भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असेही मंदिराच्या वतीने कळविण्यात आले आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

19 − eighteen =

error: Content is protected !!