बेळगाव : श्रीक्षेत्र दक्षिणकाशी कपिलेश्वर मंदिराच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही चैत्र पौर्णिमेनिमित्त जोतिबा डोंगराला निघालेल्या बेळगावातील देवदादा सासनकाठी चव्हाट गल्ली, ज्योतिर्लिंग देवस्थान नार्वेकर गल्ली यांना कोंडुस्कोप येथील पहिल्या मुक्कामी शिधा वाटप करण्यात आले.
या यात्रेदरम्यान खास बैलजोड्यांसाठी श्रीक्षेत्र दक्षिणकाशी कपिलेश्वर मंदिराच्या वतीने पौष्टिक आहाराची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच पायी जाणाऱ्या भाविकांसाठी शिधास्वरूपात आवश्यक वस्तूंचे वितरण करण्यात आले.
यात्रेच्या पहिल्या मुक्कामी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. मुक्कामस्थळी पोहोचल्यानंतर विधिवत पूजा व महाआरती करून उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमासाठी मंदिराचे अध्यक्ष राहुल कुरणे यांच्यासह अभिजीत चव्हाण, अजित जाधव, प्रसाद बाचुळकर, राजू भातकांडे, तानाजी मुतकेकर, अभय लगाडे, ज्योतिबा कावळे, प्रथमेश कावळे, रणजीत जाधव, सचिन सत्तेगिरी, आनंद बाळेकुंद्री, मदन मनगुतकर, अनिल पावशे, दौलत जाधव, संतोष हजारी, पवन मन्नुरकर, अभी पवार, निसर्ग चव्हाण, रोशन नाईक तसेच महिला सेवेकरी, ट्रस्टी व इतर सेवेकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
