बेळगाव : आनंदनगर वडगाव येथील उत्कर्ष महिला मंडळाची नुकतीच बैठक पार पडली असून सन 2026-27 ते 2029-30 या कालावधीसाठी नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी मावळत्या अध्यक्षा सुनीता पाटील या होत्या. या बैठकीत महिला मंडळाच्या अध्यक्षपदी सौ. शुभांगी प्रभाकर पाटील यांची निवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी सौ. चंदा परशराम घाडी, सेक्रेटरीपदी सौ. शिवानी उमेश पाटील, तर खजिनदारपदी सौ. प्रेमा लक्ष्मण तम्मुचे यांची निवड करण्यात आली.
याशिवाय सदस्य म्हणून श्रीमती हेमलता कानशिडे, सौ. सुनीता पाटील, श्रीमती विमल साळी, सौ. लीला तुळजाई, श्रीमती मंगल पाटील, सौ. स्मिता वेसने, सौ. वनिता पाटील, सौ. सुचेता पेंडसे, सौ. सुजाता चंदगडकर, सौ. वनिता गिंडे, श्रीमती सुमन कांदेकर, सौ. मंदाकिनी दावणे, सौ. शारदा मुरकुटे, सौ. सीमा जुवेकर, सौ. प्रतिमा पवार आणि सौ. दीपा सुतार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
नवीन कार्यकारिणीच्या निवडीबद्दल उपस्थितांनी अभिनंदन व्यक्त करत आगामी काळात मंडळाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्याचा विश्वास व्यक्त केला.
