बेळगाव : कृतीशील मराठा समाजाची महत्त्वपूर्ण बैठक मंगळवारी, दिनांक 24 मार्च 2026 रोजी आयोजित करण्यात आली आहे. ही बैठक सायंकाळी 5 वाजता जत्ती मठ, बेळगाव येथे होणार असल्याची माहिती समन्वयक अमित देसाई यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.
या बैठकीमध्ये मराठा संस्थांमधील नोकरीच्या संधी संदर्भात अलीकडे घडलेल्या घडामोडींवर सविस्तर चर्चा केली जाणार आहे. याशिवाय समाजासमोरील विविध आव्हाने, तसेच पुढील काळातील दिशा व ध्येयधोरणे ठरविण्यावरही भर दिला जाणार आहे.
समाजातील ज्येष्ठ, अनुभवी व्यक्तींसह तरुण आणि होतकरू कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपले विचार मांडावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. या बैठकीतून समाजाच्या एकजुटीला बळ मिळून ठोस निर्णय घेतले जातील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
