बेळगाव पोलीस प्रशासनाचा श्री रामसेना हिंदुस्थान कडून सत्कार; 6.36 कोटींची मालमत्ता परत केल्याबद्दल गौरव

बेळगाव पोलीस प्रशासनाचा श्री रामसेना हिंदुस्थान कडून सत्कार; 6.36 कोटींची मालमत्ता परत केल्याबद्दल गौरव

बेळगाव : शहरातील विविध गुन्ह्यांचा यशस्वी तपास करून तब्बल 6 कोटी 36 लाख 93 हजार 743 रुपयांची मालमत्ता मूळ फिर्यादींना परत केल्याबद्दल श्री राम सेना हिंदुस्थान, अनगोळ यांच्या वतीने बेळगाव पोलीस प्रशासनाचा सत्कार करण्यात आला.

बेळगाव शहर पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली 2025 वर्षभरात शहरातील विविध पोलीस ठाण्यांत दाखल झालेल्या दरोडे, साखळी चोरी, घरफोडी व वाहन चोरी प्रकरणांचा सखोल तपास करण्यात आला. पीआय, पीएसआय तसेच गुन्हे शाखेच्या पथकांनी सातत्यपूर्ण कारवाई करत आरोपींना अटक केली व मोठ्या प्रमाणात मुद्देमाल जप्त केला.

या कारवाईदरम्यान 2 कोटी 36 लाख 69 हजार 684 रुपये किमतीचे 2 किलो 332 ग्रॅम 645 मिलीग्रॅम सोन्याचे दागिने, 13 हजार 59 रुपये किमतीचे 294 ग्रॅम चांदीचे दागिने, तसेच 3 कोटी 99 लाख 1 हजार रुपये किमतीची 85 वाहने जप्त करण्यात आली. याशिवाय 1 लाख 10 हजार रुपयांची रोकडही जप्त करण्यात आली आहे.

तसेच सीईआयआर पोर्टलच्या माध्यमातून मोबाईल चोरीच्या तक्रारींचा पाठपुरावा करत पोलिसांनी सुमारे 20 लाख रुपये किमतीचे 140 मोबाईल हस्तगत केले. न्यायालयाच्या आदेशानुसार हा सर्व मुद्देमाल संबंधित मालकांना परत करण्यात आला.

या उल्लेखनीय कामगिरीबद्दल श्री राम सेना हिंदुस्थान, अनगोळ यांच्या वतीने पोलीस प्रशासनाचे कौतुक करून आभार व्यक्त करण्यात आले व त्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी संघटनेचे प्रमुख कार्यकर्ते उमेश बाळू कुर्याळकर, श्रीकांत कुर्याळकर, युवराज देसाई, प्रशांत जाधव, शिवाजी पाटील, प्रीतम पाटील आदी उपस्थित होते.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

twenty − 15 =

error: Content is protected !!