बेळगाव क्षेत्रातील घरगुती PNG (पाईप्ड नॅचरल गॅस) ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मेगा सिटी गॅस डिस्ट्रिब्यूशन प्रायव्हेट लिमिटेड यांनी जारी केलेल्या सार्वजनिक सूचनेनुसार, घरगुती PNG गॅसच्या दरात बदल करण्यात आला आहे.
नवीन दरानुसार, घरगुती PNG गॅसची किंमत आता प्रति SCM ₹52.50 (सर्व करांसह) इतकी निश्चित करण्यात आली असून हा सुधारित दर 21 मार्च 2026 पासून लागू करण्यात आला आहे. या दरवाढीमुळे बेळगावमधील ग्राहकांच्या मासिक गॅस खर्चावर काही प्रमाणात परिणाम होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, PNG कनेक्शन, बिलिंग किंवा इतर सेवांबाबत काही शंका असल्यास ग्राहकांनी कंपनीच्या टोल-फ्री क्रमांक 1800 123 1803 वर संपर्क साधावा किंवा info@meghagas.com या ई-मेलद्वारे माहिती घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
ही सूचना मेगा सिटी गॅस डिस्ट्रिब्यूशन प्रायव्हेट लिमिटेड यांच्या CGD – बेळगाव, कर्नाटक कार्यालयामार्फत जारी करण्यात आली आहे.
