बेळगाव : जिल्ह्यात शनिवारी रमजान ईद, अर्थात ईद-उल-फित्र मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार आहे. हा निर्णय अंजुमन संस्था आणि चांद कमिटीच्या वतीने अधिकृतरीत्या जाहीर करण्यात आला.
अंजुमन संस्थेचे अध्यक्ष आमदार असिफ सेठ यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सायंकाळी चांद कमिटीच्या वतीने चांददर्शन करण्यात आले. त्यानंतर मुस्लिम समाजातील धर्मगुरू आणि विविध जमात प्रमुखांच्या उपस्थितीत बैठक घेऊन शनिवारी ईद साजरी करण्याचा निर्णय घेण्यात आला.
अंजुमन-ए-इस्लामच्या सर्व उलेमा-ए-कराम यांच्या निर्णयानुसार, 21 तारखेला ईद साजरी केली जाणार आहे.
दरम्यान, शनिवारी सकाळी 9.30 वाजता बेळगाव येथील ईदगाह मैदानावर ईदची नमाज अदा करण्यात येणार असून, मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव उपस्थित राहणार आहेत.
