इस्कॉनतर्फे श्री रामनवमी उत्सवाचे आयोजन

इस्कॉनतर्फे श्री रामनवमी उत्सवाचे आयोजन

बेळगाव : इस्कॉन यांच्या वतीने राम नवमी उत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार, दिनांक २७ मार्च २०२६ रोजी हा उत्सव साजरा करण्यात येणार आहे.

टिळकवाडी येथील श्री श्री राधा गोकुलानंद मंदिर येथे होणाऱ्या या कार्यक्रमांतर्गत २३ ते २७ मार्च दरम्यान दररोज सायंकाळी ७ ते ८.३० या वेळेत परमपूज्य अनंत कृष्ण गोस्वामी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली रामनवमी कथाकथन आयोजित करण्यात आले आहे.

तसेच २७ मार्च रोजी सायंकाळी ६ नंतर कीर्तन, अभिषेक, महाआरती आणि सर्व भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

या धार्मिक सोहळ्याचा जास्तीत जास्त भक्तांनी लाभ घ्यावा, असे आवाहन इस्कॉनतर्फे करण्यात आले आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

four × four =

error: Content is protected !!