बेळगाव : कृतीशील मराठा समाजाच्या वतीने समाजातील विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी मंगळवार दि. 17 मार्च 2026 रोजी संध्याकाळी 5 वाजता जत्ती मठ येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
मराठा समाजासमोरील विविध आव्हाने, तसेच समाजातील होतकरू तरुणांसाठी मराठा संस्थांमध्ये उपलब्ध होणाऱ्या संधी यावर या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात येणार असल्याची माहिती समन्वयक अमित देसाई यांनी दिली.
समाजाच्या प्रगतीसाठी दिशा ठरविण्याच्या दृष्टीने ही बैठक महत्त्वाची असून समाजातील ज्येष्ठ जाणते व्यक्ती, तरुण कार्यकर्ते आणि होतकरू युवकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपले विचार मांडावेत, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
