कंग्राळ गल्ली येथे जिजाऊ महिला मंडळातर्फे महिला दिन उत्साहात साजरा

कंग्राळ गल्ली येथे जिजाऊ महिला मंडळातर्फे महिला दिन उत्साहात साजरा

बेळगाव :
येथील कंग्राळ गल्लीतील जिजाऊ महिला मंडळाच्या वतीने जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून शोभा लोकूर उपस्थित होत्या.

कार्यक्रमाच्या प्रारंभी दीपप्रज्वलन करून राजमाता जिजाऊ आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांचे पूजन शोभा लोकूर यांच्या हस्ते करण्यात आले. सुरुवातीला उपाध्यक्षा अनिता शंभूचे यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत करून प्रास्ताविक केले. मंडळाच्या अध्यक्षा सौ. चंद्रभागा सांबरेकर यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले, तर मिलन बडवानाचे यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. सौ. लक्ष्मी उसूलकर व रेणुका कोकितकर यांनी उपस्थितांचे पुष्प देऊन स्वागत केले.

यावेळी अदिती पवार यांनी अहवाल वाचन करून गतवर्षातील मंडळाच्या विविध उपक्रमांचा आढावा घेतला. प्रमुख पाहुण्या शोभा लोकूर यांनी ‘नर्मदा परिक्रमा’ या विषयावर अभ्यासपूर्ण विवेचन केले. अध्यक्षीय भाषणात माजी महापौर मालोजी अष्टेकर यांनी महिला मंडळाच्या कार्याचे कौतुक करत सर्व स्पर्धकांचे अभिनंदन करून मंडळाला शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमात गल्लीतील ज्येष्ठ नागरिक शंकर बडवानाचे, अशोक कंगराळकर, बाबुराव कुटरे, अंजनाताई शंभूचे तसेच इतर महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. तसेच गल्लीतील ज्येष्ठ नागरिक अनंतराव पाटील व सौ. विजया पाटील यांच्या वैवाहिक जीवनाला साठ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल जिजाऊ महिला मंडळाच्या वतीने त्यांचा भावपूर्ण सत्कार करण्यात आला.

यानंतर महिला दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या विविध स्पर्धांच्या विजेत्यांना बक्षिसांचे वितरण करण्यात आले. सुनिता शंभूचे यांनी विजेत्यांची यादी जाहीर केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्योती सुतार यांनी केले तर डॉ. स्वाती खंडागळे यांनी आभार प्रदर्शन केले. शेवटी अनंतराव पाटील यांच्या वतीने उपस्थितांना अल्पोपहार देण्यात आला.


Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

18 − two =

error: Content is protected !!