बी. के. मॉडेल हायस्कूलमध्ये ‘पोक्सो’ कायदा जनजागृती कार्यक्रम

बी. के. मॉडेल हायस्कूलमध्ये ‘पोक्सो’ कायदा जनजागृती कार्यक्रम

बेळगाव : येथील बी. के. मॉडेल हायस्कूलमध्ये ‘पोक्सो’ (POCSO) कायद्याविषयी जनजागृती करण्यासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून तृतीय सत्र न्यायालयाचे वरिष्ठ न्यायाधीश आर. एम. शिरूर तसेच शिक्षण विभागाच्या सर्व शिक्षण अभियानाचे प्रमुख बसवराज मिलानहट्टी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक एस. एन. जोशी होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. यानंतर न्यायाधीश आर. एम. शिरूर यांनी विद्यार्थ्यांना ‘पोक्सो’ कायद्याअंतर्गत येणाऱ्या बालविवाह, बालमजुरी आणि लैंगिक अत्याचार यांसारख्या गंभीर विषयांबद्दल सविस्तर माहिती दिली. विद्यार्थ्यांनी अशा घटनांविरुद्ध सजग राहावे आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवावा, असे आवाहन करत त्यांनी विद्यार्थ्यांना जागरूक राहण्याची शपथही दिली.

तसेच बसवराज मिलानहट्टी यांनीही विद्यार्थ्यांना कायद्याबाबत मार्गदर्शन करून बालहक्क आणि सुरक्षिततेबाबत महत्त्वपूर्ण माहिती दिली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन टी. आर. भास्करी यांनी केले तर आभार प्रदर्शन श्रीमती पाटील यांनी केले. या कार्यक्रमाला शाळेचे सर्व शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

three × four =

error: Content is protected !!