महिला दिनानिमित्त ज्येष्ठ नागरिक सोसायटीत महिलांचा सन्मान

महिला दिनानिमित्त ज्येष्ठ नागरिक सोसायटीत महिलांचा सन्मान

बेळगाव : बेळगाव जिल्हा ज्येष्ठ नागरिक सोसायटीच्या संध्या किरण सेवा केंद्रामार्फत जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून उपस्थित सर्व महिलांना भेटवस्तू देत महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. हा कार्यक्रम डॉ. निता देशपांडे डायबेटिस सेंटर, सोमवारपेठ टिळकवाडी येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विश्वास धुराजी होते. व्यासपीठावर कार्यवाह सुरेन्द्र देसाई, सहकार्यवाह शिवराज पाटील, मीना कुलकर्णी, जयभवानी महिला सोसायटीच्या चेअरमन वर्षा जोशी तसेच संचालिका मनिषा कुंभोजकर उपस्थित होत्या.

यावेळी मीना कुलकर्णी यांनी ‘पंच पतिव्रता’ या संकल्पनेचे महत्त्व सांगताना अहल्या, तारा, सीता, मंदोदरी आणि द्रौपदी यांच्या त्यागमय जीवनाची माहिती देत महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव केला. वर्षा जोशी आणि मनिषा कुंभोजकर यांनीही उपस्थितांना महिला दिनाच्या शुभेच्छा देत महिलांच्या समाजातील योगदानाचे कौतुक केले.

कार्यक्रमाची सुरुवात विजय वाईगडे यांच्या प्रार्थनेने झाली. यानंतर विजयमाला पाटील, विजय बांदिवडेकर, अश्विनी पाटील, योगिनी देसाई, जगमोहन अगरवाल, प्रकाश कुडतरकर, अशोक कदम आणि शोभा हतरकी यांनी मराठी, हिंदी व कन्नड गीते सादर करून वातावरण रंगतदार केले.

कार्यक्रमाचे स्वागत सुरेन्द्र देसाई यांनी केले तर आभार प्रदर्शन शिवराज पाटील यांनी केले.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

five × two =

error: Content is protected !!