५ व्या आंतर कॉलेज निमंत्रित हॉकी स्पर्धेचा शुभारंभ उत्साहात

५ व्या आंतर कॉलेज निमंत्रित हॉकी स्पर्धेचा शुभारंभ उत्साहात

बेळगाव : हॉकी बेळगावच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पाचव्या आंतर कॉलेज निमंत्रित हॉकी स्पर्धेचा शुभारंभ माजी उपमहापौर आनंद चव्हाण यांच्या हस्ते हॉकी गोलपोस्टमध्ये चेंडू मारून उत्साहात करण्यात आला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी हॉकी बेळगावचे अध्यक्ष गुळाप्पा होसमणी यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. त्यानंतर उपाध्यक्ष प्रकाश कालकुंद्रीकर यांनी संस्थेचा परिचय करून देत स्पर्धेची माहिती दिली.

या स्पर्धेत मुलांच्या गटात संगोळी रायण्णा कॉलेज, आरपीडी कॉलेज, पीपल ट्री कॉलेज, जीएसएस कॉलेज, गोगटे कॉलेज आणि व्हीटीयूच्या संघांनी सहभाग घेतला आहे. तर मुलींच्या गटात संगोळी रायण्णा कॉलेज, जीएसएस कॉलेज आणि आरपीडी कॉलेज या संघांचा सहभाग आहे.

स्पर्धेतील विजेत्या संघांना मार्कंडेय को-ऑपरेटिव्ह सोसायटी, मन्नूर यांच्या वतीने संस्थापक चेअरमन स्वर्गीय आर. डी. चौगुले यांच्या स्मरणार्थ ट्रॉफी प्रदान करण्यात येणार आहेत.

या प्रसंगी सचिव सुधाकर चाळके, नामदेव सावंत, मनोहर पाटील, माजी उपमहापौर संजय शिंदे, शांताप्पा नरगुदी, श्रीकांत आजगांवकर, निखिल शिंदे, रामकृष्ण गोपाळ खांडे, दत्तात्रय जाधव, सविता वेसणे, सविता हेब्बार, आशा होसमणी, प्रशिक्षक उत्तम शिंदे, राजू यल्लाप्पा देशनूर, प्रशांत मंकाळे आदी उपस्थित होते. स्पर्धेचे पंच म्हणून प्रफुल्ल, श्लोक, प्राजक्ता आणि विजयलक्ष्मी यांनी काम पाहिले.

दरम्यान, मुलींच्या गटातील अंतिम सामना आज संगोळी रायण्णा कॉलेज आणि आरपीडी कॉलेज यांच्यात रंगणार आहे.

आज बक्षीस वितरण समारंभ
स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ आज आयोजित करण्यात आला असून प्रमुख पाहुणे म्हणून खासदार जगदीश शेट्टर, कॅन्टोन्मेंट बोर्डचे कार्यनिर्वाहक अधिकारी हरिविजय मच्छलवार, माजी उपमहापौर आनंद चव्हाण, कर्नाटक राज्य ओबीसी भाजपचे सचिव किरण जाधव, श्रीराम सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर, मार्कंडेय सोसायटी मन्नूरचे चेअरमन प्रसाद चौगुले तसेच संचालक व भाजप नेते विनय कदम आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

eleven + eighteen =

error: Content is protected !!