मराठी भाषा गौरव दिन आणि जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून शब्दगंध कवी मंडळ संघ, बेळगाव यांच्या वतीने कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम शनिवार दिनांक ७ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ४.३० वाजता मराठी विद्यानिकेतन, बेळगाव येथे पार पडणार आहे.
या कवी संमेलनामध्ये मराठी भाषेचा गौरव, तिचे महत्त्व तसेच महिला सक्षमीकरण या विषयांवर आधारित कविता कवींकडून सादर केल्या जाणार आहेत. मराठी भाषा आणि साहित्यप्रेमींसाठी हा कार्यक्रम एक सांस्कृतिक मेजवानी ठरणार असून परिसरातील कवींनी या संमेलनात उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाचे आयोजन शब्दगंध कवी मंडळ संघाचे अध्यक्ष प्रा. अशोक आलगोंडी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंडळाचे सचिव श्री. सुधाकर गावडे प्रयत्नशील असून त्यांनी सर्व कवी आणि साहित्यप्रेमींना या कवी संमेलनात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
