श्री तुकाराम को.ऑप. बँकेत तुकाराम बीज कार्यक्रम उत्साहात

श्री तुकाराम को.ऑप. बँकेत तुकाराम बीज कार्यक्रम उत्साहात

बेळगाव :
शहापूर परिसरातील सर्वसामान्य जनता, शेतकरी तसेच नागरिकांच्या मनात मानाचे स्थान असलेल्या श्री तुकाराम को.ऑपरेटिव्ह बँक येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही तुकाराम बीज कार्यक्रम मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात आला. गुरुवार दि. ५ मार्च २०२६ रोजी फाल्गुन महिन्यात येणारा हा धार्मिक कार्यक्रम सकाळी उत्साहात पार पडला.

यावेळी किर्तनकार व प्रवचनकार ह.भ.प. राजू कावळे महाराज तसेच ह.भ.प. बाळू पाटील महाराज यांच्या सानिध्यात साग्रसंगीत पूजा करण्यात आली. बँकेसमोर उभारण्यात आलेल्या जगद्गुरू श्री तुकाराम महाराजांच्या मूर्तीची विधिवत पूजा करण्यात आली.

या कार्यक्रमाला बँकेचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे, उपाध्यक्ष, सर्व संचालक, तसेच कर्मचारी वर्ग उपस्थित होता. धार्मिक वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमानंतर उपस्थित नागरिक व भक्तांना प्रसादाचे वाटप करण्यात आले.

तुकाराम बीज निमित्त आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमामुळे परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

four + 19 =

error: Content is protected !!