अफवेच्या व्हॉट्सअ‍ॅप ऑडिओमुळे न्यू गांधीनगरमध्ये महिलेला मारहाण; पोलिसांचा तात्काळ हस्तक्षेप

अफवेच्या व्हॉट्सअ‍ॅप ऑडिओमुळे न्यू गांधीनगरमध्ये महिलेला मारहाण; पोलिसांचा तात्काळ हस्तक्षेप

गेल्या दोन आठवड्यांपासून अपहरण करणारी टोळी शहरात सक्रिय असल्याचा दावा करणारी एक ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत होती. संबंधित क्लिपची पडताळणी केल्यानंतर ती आपल्या शहरातील नसल्याचे स्पष्ट झाले आहे. तरीही या अफवेवर विश्वास ठेवून न्यू गांधीनगर परिसरात एका महिलेला संशयित अपहरणकर्ती समजून काही जणांनी मारहाण केल्याची घटना घडली.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली व संबंधित महिलेला सुरक्षित ताब्यात घेतले. तिच्यावर कोणताही गुन्हा नसल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले असून, मारहाण करणाऱ्यांविरुद्ध पुढील कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे.

या घटनेनंतर पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, अपहरण किंवा इतर गुन्ह्यांबाबत सोशल मीडियावर फिरणाऱ्या अप्रमाणित संदेशांवर विश्वास ठेवू नये व ते पुढे पाठवू नयेत. अफवा पसरवणे व कायदा हातात घेणे हा गुन्हा असून अशा कृत्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

कोणतीही संशयास्पद व्यक्ती किंवा हालचाल आढळल्यास नागरिकांनी स्वतः कारवाई न करता तात्काळ 112 या आपत्कालीन क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

18 − 11 =

error: Content is protected !!