बेळगाव : शहरात बेकायदेशीर मटका व्यवसाय व अमली पदार्थ सेवनाविरोधात पोलिसांनी धडक कारवाई करत चार जणांविरुद्ध स्वतंत्र गुन्हे नोंदवले आहेत.
मटका अड्ड्यावर छापा
दि. २६ फेब्रुवारी २०२६ रोजी एपीएमसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सार्वजनिक ठिकाणी ‘कल्याण मुंबई मटका’ जुगार सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी छापा टाकला. यावेळी विनायक विजयकुमार मादर (वय १९, रा. रामनगर, कंग्राळ, बेळगाव) याला ताब्यात घेण्यात आले. तो सार्वजनिक ठिकाणी मटका जुगार चालवत असल्याचे आढळून आले.
या प्रकरणी आरोपी क्रमांक २ सुरज गणपत साळुंके (रा. भारतनगर, बॅकसाईड रोड, बेळगाव) याचाही सहभाग निष्पन्न झाला. दोघांविरुद्ध गुन्हा क्रमांक ४२/२०२६, कलम ७८(III) के.पी. कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
गांजा सेवन प्रकरणी तिघांवर गुन्हे
त्याच दिवशी शहापूर पोलिस स्टेशन हद्दीत सार्वजनिक ठिकाणी संशयास्पद हालचाल करणाऱ्या तिघांना ताब्यात घेण्यात आले.
- अल्तमश आयुबखान पठाण (वय २५, रा. भारतनगर, पीरनवाडी, बेळगाव)
- दिशान अल्लाबख्श बिजापूरे (वय २२, रा. कंठीनगर, खासबाग, बेळगाव)
- शाबुद्दीन अब्दुलखादर सुबेदार (वय २२, रा. जयनगर, हुंचनट्टी, बेळगाव)
या तिघांनी गांजा सेवन केल्याचा संशय आल्याने वैद्यकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले. त्यांच्या विरोधात अनुक्रमे गुन्हा क्रमांक २८/२०२६, २९/२०२६ व ३०/२०२६, कलम २७(ब) एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले असून तपास सुरू आहे.
शहरात बेकायदेशीर जुगार व अमली पदार्थांवर कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.
