मराठी सन्मान यात्रा २७ फेब्रुवारी ऐवजी होणार १५ मार्च रोजी

मराठी सन्मान यात्रा २७ फेब्रुवारी ऐवजी होणार १५ मार्च रोजी

मराठी भाषा दिनी राजहंस गडावर होणार शिवरायांना व कुसुमाग्रज होणार अभिवादन

महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागच्या वतीने शुक्रवार दिनांक २७ फेब्रुवारी रोजी मराठी भाषादिनाचे औचित्य साधून मराठी सन्मान यात्रेला राजहंसगड येथून छत्रपती शिवरायांना अभिवादन करून सुरुवात करण्याचे ठरविण्यात आले होते. त्या प्रमाणे समाज माध्यम व येळ्ळूर,सुळगा,राजहंसगड, धामणे, हट्टी व सीमाभागात मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली होती, येळ्ळूर येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते, संबोधन करण्यासाठी लेखक,दिग्दर्शक नंदकुमार गुरूले हे उपस्थित राहणार होते.पण युवा समिती सीमाभागचे अध्यक्ष शुभम शेळके यांचे वडील विक्रांत शेळके यांच्या दिनांक २४ फेब्रुवारी रोजी आकस्मित निधन झाले, या आपल्या वैयक्तिक कारणामुळे लढा व यात्रा कुठेही थांबता कामा नये, असे आवाहन शुभम शेळके यांनी कार्यकर्त्यांसमोर भावना व्यक्त केली. पण कार्यकर्त्यांच्या व नेत्यांच्या सोबत झालेल्या चर्चेनंतर,तसेच विनंती नंतर २७ फेब्रुवारी रोजी राजहंसगड येथून बाईक रॅलीसह निघणारी मराठी सन्मान यात्रा तसेच जाहीर सभा स्थगित करून आता रविवार दिनांक १५ मार्च रोजी करण्यात येणार आहे.

त्याच २७ फेब्रुवारी मराठी भाषा दिनाचे औचित्य साधुन दुपारी ४ वाजता राजहंसगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन तसेच कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन करून मराठी भाषा दिन साजरा करण्यात येणार आहे. या मराठी भाषा दिनाला मराठी भाषिकांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे,असे महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

two × 1 =

error: Content is protected !!