बेळगाव : शहरातील टेंगीनकेरी गल्ली आणि पांगुळ गल्ली यांच्या कॉर्नर चौकात भर दिवसा दुचाकी चोरीची घटना घडली आहे. लाल रंगाची होंडा युनिकॉर्न (क्रमांक KA22EM 2735) ही दुचाकी चौकात पार्क करून ठेवलेली असताना अज्ञात चोरट्याने संधी साधून पळवली.
ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून फुटेजमध्ये संशयित व्यक्ती दुचाकी घेऊन जाताना स्पष्ट दिसत आहे. घटनेनंतर वाहनमालकाने तत्काळ पोलिसांत तक्रार दाखल केली असून पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू केला आहे.
दिवसाढवळ्या गर्दीच्या भागातून दुचाकी चोरीला गेल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. परिसरातील नागरिकांनी पोलिसांनी गस्त वाढवावी तसेच संशयितांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
दरम्यान, संबंधित क्रमांकाची लाल रंगाची होंडा युनिकॉर्न कुठेही आढळल्यास किंवा कोणाला संशयास्पद हालचाल दिसल्यास जवळच्या पोलिस ठाण्यात संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
#Belgav #BedhadakBelgav

