समाजसेविका माधुरी जाधव – पाटील यांच्या सहकार्याने निराधार जखमी वृद्धेची सिव्हिल हॉस्पिटलमध्ये रवानगी

समाजसेविका माधुरी जाधव – पाटील यांच्या सहकार्याने निराधार जखमी वृद्धेची सिव्हिल हॉस्पिटलमध्ये रवानगी

बेळगाव : टिळकवाडी येथील देशमुख रोड परिसरातील तोरणा संकुल कॉम्प्लेक्सजवळ गेल्या चार वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या एका निराधार वृद्ध महिलेची समाजसेविका माधुरी जाधव पाटील यांच्या सहकार्याने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी रवानगी करण्यात आली.

कत्ती फोटो स्टुडिओसमोरील तोरणा संकुल कॉम्प्लेक्सच्या प्रवेशदालनात शकुंतला नामक ही वृद्ध महिला वास्तव्यास होती. परिसरातील नागरिक तिला ‘करिष्मा’ या नावाने ओळखतात. कोणताही ठावठिकाणा नसलेली ही महिला हॉटेल तसेच स्थानिकांकडून मिळेल ते अन्न घेऊन तेथेच आपला उदरनिर्वाह करत होती.

मागील दोन दिवसांपूर्वी ती पडल्याने तिच्या पायाला गंभीर दुखापत झाली होती. तीव्र वेदनेमुळे ती सतत रडत असल्याचे लक्षात येताच परिसरातील रहिवाशांनी तातडीने समाजसेविका माधुरीताई जाधव-पाटील यांच्याशी संपर्क साधला.

माहिती मिळताच माधुरी जाधव यांनी त्वरित आपल्या सहकाऱ्यांना घटनास्थळी पाठवून संबंधित वृद्धेला ताब्यात घेतले. त्यानंतर तिला तात्काळ सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करून उपचाराची सोय करण्यात आली. या कार्यात सागर पाथरवट तसेच रुग्णवाहिका चालक मंजुनाथ लमाणी यांनीही मोलाचे सहकार्य केले.

वेळीच मदत मिळाल्यामुळे संबंधित वृद्धेला उपचार मिळू शकले. तत्परतेने मदतीचा हात पुढे केल्याबद्दल तोरणा संकुल परिसरातील रहिवाशांनी समाजसेविका माधुरी जाधव व त्यांच्या सहकाऱ्यांचे आभार मानले.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

8 + 4 =

error: Content is protected !!