बेळगाव: शुभम शेळके यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या तडीपार कारवाई संदर्भातील खटल्याची सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. सदर प्रकरणाची सुनावणी सध्या पोलीस आयुक्तालयात सुरू असून पुढील तारीख देण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.
या सुनावणीदरम्यान शेळके यांच्या वतीने ॲड. महेश बिर्जे, ॲड. वैभव कुट्रे आणि ॲड. रिचमन रिकी यांनी कामकाज पाहिले. पुढील सुनावणीत या प्रकरणावर सविस्तर युक्तिवाद होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, या प्रकरणाकडे संबंधित वर्तुळांचे लक्ष लागले असून पुढील तारखेला काय निर्णय होतो याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.
